अलिबाग : प्रतिनिधी
रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळणार्या खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) प्रक्रिया रविवारी (दि. 26) अलिबाग येथे होणार आहे. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून जिल्ह्यातील सुमारे तीनशे खेळाडूंनी स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपापला सहभाग नोंदवला आहे.
रायगडातील 25 वर्षांखालील खेळांडूसाठी रायगड प्रीमियर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मार्च व एप्रिल महिन्यात करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा जिल्ह्यातील खेळांडूसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून मानली जाते. गतवर्षी स्पर्धा दिमाखात झाली होती. या वर्षी आरपीएलचे दुसरे पर्व आहे.
खेळाडूंना ऑक्शन पद्धतीने आठ संघांचे संघ मालक आभासी पॉईंट्स प्रकाराने आपापल्या संघात दाखल करून घेतील. प्रत्येक संघात 15 खेळाडूंचे ऑक्शनद्वारे पथक तयार करण्यात येईल. रायगड जिल्ह्यातील युवा क्रिकेट खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अलिबाग येथील बॅ. ए. आर. अंतुले भवनाच्या सभागृहात होणार्या खेळाडूंच्या लिलावावेळी स्थानिक आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाचे माजी कर्णधार अर्जुन पाटील, भगवान शेट्टी, भूषण मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ऑक्शन व त्यानंतर होणार्या प्रत्यक्ष स्पर्धेची रायगडवासीयांना उत्सुकता लागून राहिली आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …