Breaking News

जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनले शिक्षक

शिक्षकांना दिले आरोग्य, स्वच्छता आणि प्लास्टिकबंदीचे धडे

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवरूषी हे कर्जत येथील शिक्षण परिषदेत शिक्षक बनले. त्यांनी शासन राबवत असलेल्या प्लास्टिकबंदीबाबत तसेच आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याची शिकवण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कर्जत तालुका दौर्‍यावर आलेले जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख प्रकाश देवरूषी यांनी पंचायत समिती कार्यालयात संबंधितांची बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देण्यासाठी ते सावळा, हेदवली भागात निघाले. वाटेत सावळे येथील शाळेत कडाव केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषद कार्यशाळा सुरू असल्याची माहिती मिळताच देवरूषी यांनी त्या शिक्षण परिषदेस हजेरी लावली. तेथे सुरू असलेल्या शिक्षण परिषदेचे सर्व कामकाज शांतपणे पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः मास्तर होत शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कोणते धडे दिले पाहिजेत याचे मार्गदर्शन केले, तसेच वैयक्तिक आरोग्य, स्वच्छता मोहीम व प्लास्टिकबंदी या विषयावरही मार्गदर्शन केले.

प्रत्येक व्यक्तीने विशेषत: वयाची चाळीशी पूर्ण केल्यानंतर आपले वैयक्तिक आरोग्य सांभाळण्यासाठी आहारावर बंधने घातली पाहिजेत. व्यायाम आणि योगा केला पाहिजे आणि आनंदी राहिले पाहिजे, असा कानमंत्र  देवरूषी यांनी या वेळी दिला.  कर्जतचे गटविकास अधिकारी बी. एस. पुरी, सहाय्यक गटविकास अधिकारी छतरसिंग रजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी जाधव, दिशा केंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले यांच्यासह कडाव केंद्रातील 43 शिक्षक या वेळी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply