Breaking News

पनवेलमध्ये स्त्री सक्षमीकरणाला प्राधान्य

महिला आर्थिक विकास महामंडळ, पालिकेतर्फे तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री

पनवेल : वार्ताहर

महिला आर्थिक विकास महामंडळ आणि पनवेल महापालिका दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने तेजस्विनी उद्योग प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 24)गुजराती मैदानावरती करण्यात आले आहे. 24, 25, 26 मार्च तीन दिवस हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले असणार आहे. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त कैलास गावडे, कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले, बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय प्रमुख नेहा सिन्हा, विभागीय सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी मंगेश सूर्यवंशी, नाबार्डचे प्रदीप अपसुंदे, जिल्हा समन्वयक अधिकारी दशरथ शिरसट, जिल्हा अग्रणी बँकेचे विजय कुलकर्णी, सारस्वत बँकेच्या प्रियांका यादव, आयसीआयसीआय बँकेचे विजय थोरात, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा पाटील, पालिकेच्या डेनयुएलएम विभागाच्या व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांनी महिलांना परिसाची उपमा देऊन महिला या कतृत्ववान असून उद्योगाची उंच भरारी त्यांनी घेतली आहे. महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवरती असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांनी महिलांनी उद्योगीनी होणे काळाची गरज असल्याचे सांगितले, प्रधानमंत्री सुक्ष्म अन् प्रक्रिया उद्योग अंतर्गत महिलांना शासनाककडून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा महिलांनी लाभ घेऊन या माध्यमातून कर्ज घेऊन आपले प्रक्रिया उद्योग सुरू करावे असे आवाहन केले. या वेळी विविध बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदतीचे धनादेश वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनामध्ये पनवेल शहराबरोबरच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून आलेल्या विविध बचत गटांच्या महिलांनी आपले स्टॉल्स उभारले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षनिमित्ताने नाचणी, बाजरी, असे विविध तृणधान्येही विक्रीस ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे मसाले, हस्तकेलेच्या वस्तू, विविध प्रकारचे पापड, कुरडई, शेवया, लोणची, कृत्रिम फुले, पर्स-पिशव्या, ज्युटच्या वस्तू, गावरान धान्य विक्रीस ठेवण्यात आली आहेत. या वेळी विभाग प्रमुख अनिल कोकरे साहेब, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड साहेब, स्वचछता निरीक्षक जयेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक महेंद्र भोईर, स्वच्छता निरीक्षक धनश्री पिवाल उपस्थित होते.

लवकरच महापालिका शहर उपजिविका केंद्र (सीएलसी सेंटर) उभारणार आहे. या माध्यमातून एक अ‍ॅप लाँच करणार असून या अ‍ॅपवरती बचत गटाच्या तसेच इतर विक्रेत्यांनी आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे. ज्यांना खरेदी करायची आहे त्यांनी आपली मागणी या पवरती नोंदवायची आहे. घरबसल्या नागरिकांना ती वस्तु मिळविता येणार आहे. या अ‍ॅपवरती सर्वांनी आपले नाव नोंदणी करावे.

-कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल मनपा

 

कचरा वर्गीकरणाबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती

तीन दिवस चालणार्‍या या प्रदर्शनामध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने ओल्या कचर्‍यापासून तयार करण्यात आलेले कंपोस्टिंग खत विक्रीसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. या वेळी ओला कचरा व सुका कचरा याबद्दल नागरिकांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply