Breaking News

सानपाडा-जुईनगरला जोडणारा रस्ता पुन्हा खुला

नवी मुंबई : बातमीदार

लॉकडाऊन काळात सानपाडा आणि जुईनगर विभागाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. सर्वपक्षीयांनी हा रस्ता खुला करावा, अशी मागणी सातत्याने पालिकेकडे लावून धरली होती. अखेर त्यास यश येऊन सोमवारी हा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जुईनगरवासीय व सानपाडा विभागदरम्यान कार शेडच्या रेल्वे ट्रॅकमुळे हा रस्ता विभागाला गेला आहे. तर दुसरीकडे जुईनगर रेल्वे स्थानक व अत्यावश्यक सेवांसाठी महत्वाचे मानले जाणारे डी मार्ट हे सानपाडा विभागाला लागून असल्याने सर्वसामान्यांना अडचणीस सामोरे जावे लागत होते. जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु नागरिकांना ये-जा करण्यासाठी सदर मार्ग खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका, चाकरमानी, विविध कामानिमित्त सानपाडा अथवा जुईनगर भागात ये-जा करणार्‍या नागरिकांना वळसा मारून सायन-पनवेल महामार्ग किंवा पामबीच मागार्ने यावे लागत होती. बाईक्सवर तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूने जाणारा धोकादायक मार्ग अवलंबून जात होते. या निमुळत्या वाटेच्या बाजूला रेल्वे ट्रॅक तर दुसर्‍या बाजूस नाला अशा वाटेवरून बाईकस्वार सानपाडा व अथवा जुईनगरमध्ये जात असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला होता.

याबाबत भाजपचे विजय साळे  व इतर सामाजिक संघटनांनी पालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार करून हा रस्ता खुला करावा यासाठी दाद मागितली होती. त्यानुसार महापालिकेने सोमवार 22 जून रोजी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. यामुळे या मागाने ये-जा करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Check Also

पनवेल, उरणमधील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणार

महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 …

Leave a Reply