पनवेल : रामप्रहर वृत्त
काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 25) भारतीय जनता पक्ष पनवेलच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी राहुल यांच्या फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच माफी मागा, अशी मागणी करण्यात आली.
मोदी आडनावावरून बेताल वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधीविरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याला अनुसरून पनवेल शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयावळ तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल यांचा निषेध करण्यात आला.
या वेळी शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी मोर्चा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अॅड. वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, ओबीसी मोर्चाचे पनवेल ग्रामीण मंडळ अध्यक्ष अप्पा भागीत, शहर मंडळ अध्यक्ष रामनाथ पाटील, अनुसूचित जाती मोर्चा शहर अध्यक्ष शाम साळवी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, के. सी. पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, गौरव कांडपिळे, सपना पाटील, लीना पाटील, शिल्पा म्हात्रे, मधुकर उरणकर, चंद्रकांत मंजुळे, विजय म्हात्रे, सुधाकर खवई, रघुनाथ बहिरा, शिवाजी भगत, राकेश भुजबळ, प्रसाद म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …