Breaking News

अजिवली येथील शाळेला बेंचचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील अजिवली येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिरासाठी बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. दशरथ म्हात्रे यांच्या आई कैलासवासी दुनकुरीबाई बाळू म्हात्रे यांच्या दुसर्‍या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबवला आहे. त्यानुसार भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या बेंचचे वाटप शनिवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील,  पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, ज्ञानेश्वर भागीत, गोविंद पाटील, वसंत काठावले, विठ्ठल गातारे, कान्हा कडव, विनेश भागीत यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply