Breaking News

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, वाहनचालक बचावला

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झीटजवळ   चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो रविवारी (दि. 16) सकाळी महामार्गाच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. या अपघातात वाहनचालक सुदैवाने बचावला.

अद्रकने भरलेला टेम्पो एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईला जात होता. खोपोली एक्झीटजवळ रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एक्सप्रेस वेच्याबाजूच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवत वाहनातून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. या अपघातात टेम्पोमधील अद्रकने भरलेल्या गोणी एक्सप्रेस वेवर पसरल्यामुळे एक्सप्रेस वेच्या दोन लेन काहीकाळ   वाहतूकीसाठी बंद झाल्या होत्या. आयआरबी कंपनीचा हायड्रा बोलावून टेम्पो बाजूला कढण्यात आला.

अपघाताची माहिती मिळताच डेल्टा फोर्स आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरु केले. त्यानंतर एक्सप्रेस वेवरील वाहतूक  सुरळीत करण्यात आली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply