Breaking News

प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतून दिले 50 बाकडे

पनवेल : रामप्रहर वृत्त

नगरसेवक व भाजपचे प्रवक्ते प्रकाश बिनेदार यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रभाग क्र. 17 मधील विभागात 50 सिमेंटच्या बसण्याच्या बाकड्यांचे नियोजन करून ते विभागात वेगवेगळ्या व इच्छितस्थळी बसविण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या नगरसेवक निधीतून लोकोपयोगी कामांचे भरपूर प्रमाणात नियोजन करण्याचा मानस सतत मनात ठेवून ती कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यतत्परता सदैव जपण्याची परंपरा नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी आतापर्यंत पाळली आहे.

त्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांमार्फत पनवेल एसटी डेपोत, शिवाजी नगर रिक्षा स्टॅन्डजवळ (पुलाखाली), एनएमएमटी बस थांबा (पुलाजवळ), नर्मदा कॉम्प्लेक्सजवळ, भगत चाळ पनवेल स्टेशन रोड, नवनाथ नगर फुटपाथ पनवेल स्टेशन रोड, नवीन छोटेखानी सभागृह परिसर, पनवेल रेल्वे स्टेशन रोड, एसटी डेपोच्या मागील बाजूच्या भिंतीच्या कंपाऊंड लगत, इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या परिसरात व समोर, रत्नदीप हॉटेल एसटी स्टॅन्डच्या मागे, बालाजी आंगण ओरियन मॉलच्या मागे, पितांबर सोसायटी पनवेल रेल्वे स्टेशन रोड, ओरियन मॉलच्या बाजूला आदी ठिकाणी या सिमेंटचे बसण्याचे बाकडे बसविण्यात आलेले आहेत. उर्वरित बाकडे नवीन पनवेलच्या प्रभाग 17च्या विभागात बसविण्यात येणार आहेत.

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या अनेक धडाकेबाज लोकोपयोगी कार्यात लक्षणीय वाढ होत असल्याने येथील नागरिक नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे आभार मानत आनंद आणि समाधान व्यक्त करीत आहेत. याकामी शिवाजी नगर, पनवेल येथील धडाडीचे कार्यकर्ते रावसाहेब खरात, राहुल वाहुळकर, अमोल रहाणे, विजय झिरे आदी कार्यकर्त्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply