मुंबई : प्रतिनिधी
सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 25) भाजपमध्ये प्रवेश केला. ’बारामतीशी आमचा थेट संघर्ष झाला,’ असे म्हणत रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
माढा लोकसभा मतदारसंघातील युतीची उमेदवारी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचे पारडे जड होताना दिसताच शरद पवारांनी हालचाली करीत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदवारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा होती, पण आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेससह राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.