Breaking News

पनवेल महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे नागरिकांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील पनवेल शहरातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता 15 जून 2023 पर्यंत पाणी पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या दृष्टीने 26 डिसेंबरपासून पनवेल शहरामध्ये उंच जलकुंभ निहाय एक भाग आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

सोमवारी सुभेदार वाडा, गुणे हॉस्पिटल, शिवसेना उंच जलकुंभ, शिवसेना कार्यालय ते भैरवनाथ डेअरीपर्यंत, भैरवनाथ डेरी ते ससाने हॉस्पिटलपर्यंत, अशोका गार्डन सोसा. मेवाड हॉटेल ते मशीद – अर्बन को. ऑप. बँक ते गणपती परिसर, गुडेकर डेअरी ते रेखी हॉटेलपर्यंत घाटे आळी, गावदेवी मंदिर परिसर, गुडेकर डेअरी ते पनवेल पॅलेसपर्यंत, परदेशी आळी ते अंबर सोसा. पर्यंत, गावदेवी पाडा भाग, गुणे हॉस्पिटल ते लाईफ लाईन हॉस्पिटलपर्यंत, गुडेकर डेअरी ते घोडके हॉस्पिटलपर्यंत, परदेशी आळी सर्व बैठी घरे, मेन व्हॉल, रचना रेसीडेन्सी सोसा. अष्टविनायक श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत, श्री लॉज ते निलेटा गार्डनपर्यंत, सुभेदार वाडा सर्व बैठी घरे, आदर्श हॉटेल ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत इत्यादी.

यशोपुरम सोसा. आगरी समाज ते व्ही. के. हायस्कूलपर्यंत, जुने पोस्ट ऑफिस ते डॉ. बुधकर दवाखान्यापर्यंत श्री गांगल यांच्या घरापर्यंत ते मेवाड हॉटेलपर्यंत, जय भारत नाका ते भिंडे यांच्या घरापर्यंत, घोडसे आळी बैठी घरे, विरुपाक्ष हॉटेल ते लोंढे मॅडम ह्यांच्या घरापर्यंत, आदर्श हॉटेल ते आदित्य कॉम्पलेक्सपर्यंत,मनिष मार्केट, जय भारत नाका ते बैठी घरे, जैन मंदिरपर्यंत, जय भारत नाका ते रतन टॉकिज पर्यंत, त्रिमुर्ती सहनिवास सोसा. अन्नपूर्णा हॉटेल ते निसर्ग बिल्डींग पर्यंत, गोखले हॉल ते प्रज्ञा सोसायटी पर्यंत.

मंगळवारी माणिक नगर, स्नेहसदन सोसायटी, यशोदिप सोसायटी, पटेल पार्क भाग, उपजिल्हा रुग्णालय, जैन मंदिरपासून भूसार मोहल्ला बैठी घर, पंचायत समिती झोपडपटटी, कोहिनूर टेक्निकल ते किंग इलेक्ट्रोनिकपर्यंत, कोहिनूर टेक्निकल ते नवनाथ मंदिरा पर्यंत, मामलेदार कचेरी ते दत्तराज सोसायटी, साठे गल्ली, विरुपाक्ष मंदिर ते साहिल सोसायटीपर्यंत, सिटी स्टोर्स गल्ली, सिनियर ज्युनियर गल्ली. आगरी समाज हॉल ते घोडके हॉस्पिटल पर्यंत, गायकर गल्ली सर्व बैठी घर, शुभलाभ सोसा ते सहयोग नगर पर्यंत, सुतिका गृह ते यशोमंगल सोसायटी पर्यंत, उमा शंकर सोसा. ते यशोवर्धनपर्यंत. आदर्श हॉटेल ते रत्नेश अपार्टमेंटपर्यत. कुबेर सोसायटी ते शुभलाभ सोसायटी, धुतपापेश्वर ते मुनोथ नगर पर्यंत. मुनोथ नगर ई विंग प्रिन्स पॅराडाईज सोसा सनराईज सोसा. केशव सोसायटी. केशव बाग (घतघ) इत्यादी

गुरुवारी मिडलक्लास सोसा. (भाग -1) आमदार निवास रोड परिसर, प्लॉट नं. 11 ते प्लॉट नं. पै मॅडम निवास पर्यंत, विश्राळी तलाव ते पंजाब हॉटेल, पेट्रॉल पंप पर्यंत विश्राळी नाका ते पंजाब हॉटेल पर्यंत, विश्राळी तलाव झोपडपट्टी परिसर, मिडल क्लास सोसायटी भाग 2 – गांधी हॉस्पिटल, आय.सी.सी.आय बँक पर्यंत, गांधी हॉस्पिटल से अक्सिस बैंक पर्यंत, प्लॉट नं. 64 से रायगड बँक पर्वत, शेषगिरी बंगला ते अमेय हॉस्पिटल पर्यंत, प्लॉट नं. 36 ते रुपाली टॉकिजपर्यंत.

दरम्यान, नागरिकांना होणार्‍या त्रासाबद्दल माजी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply