Breaking News

लाकडाच्या गोदामात लागलेल्या आगीत मोठे नुकसान

सोमाटणे गावाच्या हद्दीतील घटना
पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे.
पनवेल तालुक्यातील सोमाटणे गावाच्या हद्दीत एका लाकडाच्या गोदामाला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस उपनिरीक्षक गुटाळ, पोलीस हवालदार अमोल कांबळे, अमर भालसिंग व पथक घटनास्थळी रवाना झाले. व तातडीने त्यांनी तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाचारण केले. त्यांनतर अथक प्रयत्नाने आग नियंत्रणात आली. सदर आग कोणत्या कारणामुळे लागली याचा तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply