Breaking News

आदईत शिव मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर, रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती

 

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील आदई येथील प्राचीन स्वयंभू शिव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन मंगळवारी (दि. 25) मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होेते. दरम्यान, या वेळी महिलांसाठी हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम रंगला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकू र आणि महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून महिलांना पैठणी देण्यात आली.
या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘अग अग बनशी बनशी’ फेम सनी फडके आणि अनुष्का कदम कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. या वेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नीता माळी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष वर्षा नाईक, लीना पाटील, प्रतीभा भोईर, आदईच्या माजी सरपंच ज्योती भोपी, दीपिका शेळके, ज्योती काकडे, जाई शेळके, आयोजक जगदीश शेळके, महादू शेळके, राजेश काकडे, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, श्रीचंद भंडारी, बाळाशेठ पाटील, कैलास पाटील, किरण शेळके, एकनाथ शेळके, मंगेश भोपी, निलेश गडगे, राहुल पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply