Breaking News

शेकापचा लाचखोर सरपंच जेरबंद; मुरूडमध्ये कारवाई

मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच मनीष नांदगावकर यांना एका शेतकर्‍याकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील आदाड येथील तक्रारदार शेतकरी यांनी गांडूळ खत बनविण्यासाठी शेडचे असेसमेंट नोंद करण्याकरिता ग्रामपंचायतीमध्ये रितसर अर्ज केला होता. ही परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी शेतकर्‍याकडे 75 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, या शेतकर्‍याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून सरपंच मनीष नांदगावकर यांना मंगळवारी (दि. 25) ग्रामपंचायत कार्यालयात 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.
लाचखोर सरपंच मनीष नांदगावकर यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या लाचखोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply