नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईतील नेक्सस सीवुडस मॉलमध्ये लोप पावलेल्या महाकाय प्राण्यांची 48 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मानवाचा उदय होण्यापूर्वी एकेकाळी हे प्राणी या भूतलावर राज्य करत होते. मात्र कालौघात हे प्राणी हळूहळू नष्ट होत गेले. फॅशन, खानपान, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना नवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी नेक्सस सीवुडस मॉल सातत्याने प्रयत्न करत असते. यात भर पडलीय ती थक्क करणार्या आणि ज्ञानामध्ये भर घालणार्या नव्या उपक्रमाची. नेक्सस सीवुडस मॉलमधील या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होऊ लागली असून या मॉलमध्ये लोप पावलेल्या प्राण्यांची दुनिया ग्राहकांसमोर उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. द लॉस्ट वर्ल्ड या थीमवर आधारीत या उपक्रमामध्ये लाखो वर्षांपूर्वीचे प्राणी कसे होते हे सर्वसामान्यांना कळावे यासाठी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. 11 विविध प्राण्यांच्या प्रतिकृती पाहिल्यानंतर ग्राहक आणि खासकरून लहान मुलं खुश होतात. विशेष बाब ही आहे की हे प्राणी हलते असणार आहे, उदा. तुम्ही मॉलमध्ये आल्यानंतर दिसणारा केसाळ हत्ती हा त्याची सोंड हलवताना पाहायला मिळू शकेल किंवा लांब सुळे असणारा वाघ त्याचे सावज टीपताना नजरेस पडू शकेल. नव्या पिढीला लुप्त झालेले लाखो वर्षांपूर्वीचे जग कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानवाचे अस्तित्व निर्माण होण्यापूर्वीची ही दुनिया होती, जी या प्रतिकृतींद्वारे जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. झूल असलेला हत्ती, तीक्ष्ण सुळे असलेला वाघ यांच्याव्यतिरिक्त इथे लाखो वर्षांपूर्वीचे खवले मांजर, भलंमोठं अस्वल, जंगल, धबधबे आणि या वातावरणात राहणारे पशूपक्षी या मॉलमध्ये पाहायला मिळणार आहे. मॉलमध्ये येणार्या बच्चेकंपनीला कला, हस्तकलेच्या माध्यमातून नवे ज्ञान देण्याचाही या निमित्ताने प्रयत्न करण्यात आला आहे.
Check Also
उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …