पेण : प्रतिनिधी
येथील अंकुर ट्रस्ट आणि मैत्रेय राज फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने पेण तालुक्यातील बेलवडे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती तसेच तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कोरोनाचा फैलाव आता आदिवासी वाड्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र ही महामारी व लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये अनेक गैरसमज आहेत. तो दूर करण्यासाठी अंकुर ट्रस्ट आणि मैत्रेय राज फाऊंडेशन या संस्थांतर्फे बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांतील 47 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली व मोफत औषधे दिली. या वेळी डॉ. देवल दोशी यांनी आदिवासींना कोरोना विषयीचे समज व गैरसमज सोप्या भाषेत समजवून सांगितले.
डॉ. मैत्रेयी पाटील यांनी लसीकरणाचे महत्व सांगून कोरोना प्रतिबंधक त्रीसुत्री पद्धतींचे अवलंबन करण्याचा सल्ला दिला. सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी आरोग्य यंत्रणेस सहकार्य करण्याचे या वेळी आवाहन केले.