Breaking News

गव्हाण विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी

पनवेल : रामप्रहर वृत्त
बहुजनोद्धारक, आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष पूर्तीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रारंभी विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांचे हस्ते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.या वेळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनींनी राजर्षी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषण केले.संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर यांनीही लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.या वेळी प्राचार्या साधना डोईफोडे यांच्यासह विद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद मंडले, पर्यवेक्षिका विशाखा मोहिते,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, ज्युनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे यांचे सह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभागाच्या सहायक हर्षाला पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply