माणगाव : प्रतिनिधी
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी- निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीने लाक्षणीक संप पुकारला होता. त्याला बुधवारी (दि. 23) माणगावातही प्रतिसाद मिळाला. समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली माणगावमधील राज्य सरकारी कर्मचारी या संपात सहभागी झाले असून त्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत तहसीलदार प्रियंका अयरे कांबळे यांना निवेदन दिले.
समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, ग्रामसेवक संघटना अध्यक्ष नरेंद्र गाडगे, सचिव एस. बी. राजीवडे, कृषी विभाग अध्यक्ष सुयश नलावडे, मंगेश पावसे, हिवताप संघटना अध्यक्ष सुनील मोरे, सरचिटणीस तुषार सुर्वे, शाम खोपकर, योगिता पाटील, माधुरी उभारे, वंदना बागुल, भारती पाटील, प्रमिला भागडे, विश्वास गडदे, जितेंद्र टेंबे, नथुराम सानप, जितेंद्र टेंबे आदी पदाधिकार्यांसह तालुक्यातील कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.