Breaking News

राज्यात थंडीची चाहूल

रात्री तापमानात झपाट्याने घट

पुणे : प्रतिनिधी
नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडयात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे.
राज्यात पुढील आठवडाभर कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
देशात 148 दिवसांचे वास्तव्य करून 23 ऑक्टोबरला र्नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत, तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडयातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 12 ते 14 अंशांपर्यंत खाली आले आहे. कोकणात 19 ते 22, मराठवाडयात 14 ते 17, तर विदर्भात 17 ते 18 अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे 12.2 अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply