Breaking News

नेरळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

एकाच रात्री चार ठिकाणी चोर्‍या, तर एक प्रयत्न फसला

कर्जत ः प्रतिनिधी

नेरळ गावातील कुंभार आळी भागातील जैन मंदिर आणि बाजूला असलेल्या इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये चोरीची घटना घडली. याच रात्री नेरळ पोलीस ठाणेसमोरील शैलेश नगर भागातील तीन बंगल्यांत घरफोडीची घटना घडली आहे. नेरळ बाजारपेठ भागातील त्या बंद फ्लॅटमधून तब्बल चार लाख 72 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. जैन मंदिरातील चोरीचा प्रयत्न मात्र फसला. नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कुंभार आळी भागातील श्री अंबा माता हॉल परिसरात असलेल्या श्री गणेश को. ऑप. हौसिंग सोसायटीमधील तळमजला प्लॅट नंबर चारमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून कपाटातील लॉकर आणि डॉव्हरमध्ये ठेवलेले चार लाख 72 हजाराचे दागिने लंपास केले. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. याच रात्री नेरळ पोलीस ठाणे समोरील देबाशिष या बंगल्याचे मालक मुंबई येथे राहतात. त्यामुळे चोरट्यांनी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून वरचा मजल्यावर असलेले कपाट तोडून त्यातील सामान अस्तव्यस्त केले, याच बंगल्याचे परिसरात आणखी दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर नेरळ बाजारपेठमधील जैन मंदिरातदेखील चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता, मात्र हा प्रयत्न फसला.

पोलादपूरमधील ज्वेलर्समध्ये चोरी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास; गुन्हा दाखल

पोलादपूर ः प्रतिनिधी

शहरातील उज्ज्वल ज्वेलर्स या दुकानातील सुमारे पावणेदोन लाखांचा ऐवज चोरी केल्याप्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलादपूर शहरामध्ये गेल्या महिनाभरामध्ये तीन अज्ञात चोरट्यांनी नागरिकांसह पोलीस खात्याचीही झोप उडविली आहे. शिवाजीनगर येथील पाच-सहा दुकाने व घरांमध्ये चोरीच्या घटना एकाच रात्री घडल्यानंतर पोलादपूर एसटी बसस्थानकासमोर चोरी झाल्याचे आढळले होते. याप्रकरणी अज्ञात तीन चोरटे असल्याचे काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले, मात्र या घटनांची गांभीर्याने नोंद होऊ शकली नव्हती. उज्ज्वल ज्वेलर्स या गांधी चौकातील दुकानामध्ये शनिवारी (दि. 6) पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास तीन व्यक्तींनी चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तारा, 1.15 लाख रु. किमतीच्या नाकातील चमकीच्या 20 ग्रॅम वजनाची चार पाकिटे, 17 हजारांचे तीन ग्रॅम सोन्याचे मणी, 12 हजार रु. किमतीचे 170 गॅ्रम चांदीचे जोडवे, सहा हजार रु. किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे चांदीचे छल्ले, चार हजार रु. किमतीचे 80 ग्रॅम वजनाचे लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे असा एकूण एक लाख 77 हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलादपूर सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक नटे तपास करीत आहेत.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply