Breaking News

मुलींनी गैरवर्तनाची माहिती पालकांना द्यावी; जिल्हा न्यायाधीशांचा सल्ला

अलिबाग : प्रतिनिधी

आपल्या नात्यातला, ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही पुरुष आपल्याशी गैरवर्तन करीत असेल, तर मुलींनी त्याची महिती आपल्या पालकांना द्यावी. त्यामुळे पुढील धोके टाळता येतील,  असा सल्ला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) वर्षा मोहिते यांनी येथे दिला.

बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयातील विद्यार्थिनींकरिता  आयोजित करण्यात आलेल्या विधी साक्षरता शिबिरात जिल्हा न्यायाधीश वर्षा मोहिते मार्गदर्शन करीत होत्या. विधी प्राधिकरणाचे न्यायाधीश संदीप स्वामी, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. निहा राऊत, चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील आदी या वेळी उपस्थित होत्या. मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, त्याविषयी मुलींचे अज्ञान, त्यांना वाटणारी भीती याविषयी न्या. वर्षा माहिते यांनी विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांना लैंगिक अत्याचाराविषयी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. निहा राऊत यांनी प्रास्ताविक, तर न्या. संदीप स्वामी यांनी आभार मानले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply