Breaking News

कोविड नियमांचे उल्लंघनप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाखांचा दंड वसूल

पनवेल : वार्ताहर

शासनाने आखून दिलेल्या कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यात अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क न लावणारे नागरिक तसेच गर्दी करणार्‍या नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. काही नागरिक मास्क परिधान करत नाहीत तसेच गरज नसताना अनेक ठिकाणी गर्दी केली जाते. तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने तालुक्यातील दुकाने, गर्दीची ठिकाणे, होलसेल दुकाने, मेडिकल, डेअरी, इतर शॉप या ठिकाणी मास्क परिधान न करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये अडीच लाखांचा दंड वसूल केला. त्यामुळे नागरिकांनी मास्क परिधान करावा आणि गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Check Also

दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षम करण्यासाठी आमची तळमळ -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्ततळागाळात दुर्गम भागातील विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जायला पाहिजे ही आमची तळमळ असते, …

Leave a Reply