Breaking News

महाडजवळ एसटी बस आणि डंपरची धडक

दोन्ही चालकांसह 24 जण जखमी

महाड : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक नातेखिंडजवळ मंगळवारी (दि. 9) एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक आणि 22 प्रवासी असे एकूण 24 जण जखमी झाले आहेत.
मुंबई डेपोमधून मंगळवारी 40 प्रवाशांना घेऊन जाणारी मुंबई-महाबळेश्वर बस (एमएच 14-बीटी 3082) सकाळी 9.45च्या सुमारास महाड शहरानजीक असलेल्या नातेखिंड या ठिकाणी आली असता समोरून येणार्‍या व मुंबई दिशेला जाणार्‍या डंपर (एमएच 06-बीवी 5200)वर जाऊन आपटली. त्यामुळे दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्यभागी अडकून पडली.
या अपघातामध्ये एसटी चालक सिद्धार्थ राजेंद्र जंगम (31, बांधण, अलिबाग), उमेश दत्तात्रय शिंगटे (35, सळवल, सातारा), अजित बाळ पाटील (51, पेण), विमल महेश शिगवण (40) व नमिता गोविंद वाघमारे (60, दोघे तळेगाव, माणगाव), कलंदर जरुद्दीन कुवारे (38), अलमास असीम कुवारे (36), अफोज अजीज कुवारे (36), अब्दुल रहेमान आसिफ कुवारे (7), महमद शहा अब्दुल अजीज कुवारे (10), मरियम अब्दुल अजीज कुवारे (12), व फातिमा आसिफ कुवारे (3, सर्व नागोठणे), शांती दगडू भोसले (70), कविता नरेश मानंद (38) व सविता आदेश भोसले (31, सर्व देवळी, माणगाव), उमेश बळीराम खैर (42, कोलाड, रोहा), सुनील सुदाम रसाळ (51, सापे, महाड), लतिका लक्ष्मण शिंदे (45, छत्री निजामपूर, महाड), सविता सखाराम शिर्के (50, चिंचवली, माणगाव), भारती लक्ष्मण हिरवे (17) व दीपाली लक्ष्मण हिरवे (20, रानसई, पेण), शर्वरी अनंत कासार (20, गोरेगाव, मुंबई), आप्पा पोपट चव्हाण (34, बरड, सातारा) असे 24 जण जखमी झाले आहेत.
अपघाताची खबर मिळताच महामार्ग वाहतूक शाखा आणि महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत केली.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply