उरण ः वार्ताहर
उरण तालुक्यातील मोठी जुई येथील शेतकरी कामगार पक्ष, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन रविवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले.
मोठी जुई येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी जिल्हा परिषद विजय भोईर, जीवन गावंड, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, प्रकाश ठाकूर, पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष कौशिक शाह, माजी नगरसेवक राजू ठाकूर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, युवा पूर्व विभाग अध्यक्ष प्रवीण घासे, रोशन पाटील, धनेश गावंड, देवेंद्र पाटील, मिलिंद पाटील, मोठी जुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कुमार पाटील, धुतूमचे माजी सरपंच धनाजी ठाकूर, महिला कमिटी, युवा कमिटीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी परेश पाटील, काशिनाथ पंडित, देविदास भगत, विद्याधर पाटील, श्रीयस पाटील, नवदीप पाटील, नितिकेश पंडित, जिचेन भगत, मधुकर भोईर, नरेश पाटील, जवान पाटील, हरेश भोईर, भरत भोईर, निलेश काशिनाथ भोईर, सतीश भोईर, दिनेश पंडित, निलेश शंभा भोईर, आनंद पाटील, गणेश गोवारी, सूरज कदम, अनिकेत पाटील, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत गावंड, हर्ष भगत, प्रवीण भगत, रवींद्र कामोठकर, वासुदेव पंडित, सचिन भोईर, रोमेश पाटील, दुर्गेश पाटील, धनश्री पाटील, छाया पाटील, मनीषा पाटील, अस्मिता पाटील, लीला पाटील, अनिता पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …