शिक्षण संस्थेमार्फत बहुमानाचे पारितोषिक प्रदान; सर्वोत्त्कृष्ट कामगिरीचा मान्यवरांकडून गौरव
कामोठे : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या विद्यालयातून सन 2022-23चे कर्मवीर पारितोषिक हे बहुमानाचे पारितोषिक कामोठे येथील लोकनेते रामशेठ इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (एलआरटीइएमएस) या विद्यालयाला शिक्षण संस्थेमार्फत जाहीर झाले. त्यानुसार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64व्या पुण्यतिथी कार्यक्रमात सातारा येथे सर्वोत्कृष्ट मानाचा कर्मवीर पारितोषिक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कर्मवीर पारितोषिक पुरस्कार सन्मानपत्र व ट्रॉफी ह्याचा स्वीकार रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, प्राचाया स्वप्नाली म्हात्रे, पर्यवेक्षिका कुसुम प्रजापती व सारिका लांजुडकर यांनी स्वीकारले.
लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनि. कॉलेज, कामोठे ला उकृष्ठ कामगिरीबाबत सन 2022-23 चे रयत शिक्षण संस्थेचे मानाचे कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाले. या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमात उपस्थित असणार्या मान्यवरांनी कौतुक केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी कार्यक्रम व पुरस्कार सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुनील भुसारा तसेच चेतन तुपे, आशुतोष काळे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, अरुण लाड शशिकांत शिंदे, निलेश लंके, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, माई पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याचप्रमाणे संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, महेंद्र घरत, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, सचिन पाटील, सुरेश पाटील, सुधीर घरत, विश्वनाथ कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व इतर आमदार, संस्था पदाधिकारी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था, सातारा, आमदार डॉ. विश्वजीत कदम, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा तसेच सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आजीव सेवक लाईफ वर्कर, प्राचार्य, शाखाप्रमुख व संस्था हितचिंतक हजर होते. यांच्या उपस्थितीत कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रम या भव्य सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, कामोठे या स्कूलला कर्मवीर पारितोषिक प्रदान करण्यात आले. याबद्दल समाजाच्या सर्व घटकांकडून या स्कूलचे कौतुक होत आहे.