Breaking News

नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गॅस लाईनच्या कामाला सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग 18 मध्ये कार्यकुशल असे लोकप्रतिनधी असलेले नितीन जयराम पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अष्टविनायक कॉलनी व परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रभाग 18 मधील अष्टविनायक कॉलनी व परदेशी आळी, न्यायाधीश निवास परिसरात महानगर गॅस लाईनच्या जोडण्या अद्याप झाल्या नव्हत्या. त्या अनुषंगाने तेथील रहिवाशांनी माजी नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालायत तक्रार नोंदीत केली होती. याची तातडीने दखल घेत नितीन जयराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिका व महानगर गॅस कंपनीच्या संबंधित अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार महानगर गॅस लाईन जोडणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अनोळखी वाहने त्या ठिकाणी रस्त्यावर पार्क केल्याने अडथळा निर्माण होत होता. हे लक्षात येताच नितीन पाटील यांनी पनवेल महानगरपालिका प्रभाग अधिकार्‍यांशी संपर्क साधून अडथळा निर्माण करणारी वाहने बाजूला केली आणि गॅस जोडणीचे काम सुरळीत करून दिले. त्याबद्दल तेथील रहिवाशांनी माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply