मुंबई : प्रतिनिधी
यंदा मान्सून अंदमानमध्ये उशिराने दाखल होण्याचा अंदाज हवामानाची माहिती देणार्या स्कायमेट वेदर या खासगी संस्थेने वर्तविला आहे तसेच केरळात नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र नैऋत्य मान्सूनसंदर्भात आताच सांगणे कठीण असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
मान्सून अंदमानमध्ये साधारणत: 22 मे रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा त्याची सुरुवात कमकुवत दिसत आहे. त्यामुळे यंदा मान्सून अंदमानमध्ये विलंबाने दाखल होण्याचा ‘स्कायमेट’च्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे, तर भारतीय हवामान विभागाकडून पुढील एक ते दोन दिवसात अंदमानात मान्सून कधीपर्यंत दाखल होईल या संदर्भातील माहिती दिली जाणार आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …