Breaking News

राजभाषा हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणेमार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
या हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय राजभाषा हिंदी रत्न पुरस्कार मिळाला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि प्राचार्य राज अलोनी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र
प्रदान करण्यात आले.
अनन्या अरोरा, नयना सैनी, आकिफा जावेद, मायरा शाह, झोया मुसा शेख, मीरा रॉबिन पटेल, अवनी उमेश भोसले, चैतन्य डोंगरे, रुमाना इम्रान काझी, झोया सिद्दीकी, तीर्थ निरंजन हांडे, हाफिजा खान, सेजल जगताप, सार्थक मालुसरे, लक्ष्मी लाक्रा, मोहम्मद अयान खान अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने शाळेला जास्तीत जास्त सहभागासाठी आदर्श पाठशाला पुरस्कार, मुख्याध्यापिका राज अलोनी यांना व आदर्श शिक्षिका पुरस्कार अनिता मिश्रा यांनाही गौरविण्यात आले. या वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply