माथेरान : प्रतिनिधी
नेरळ ते माथेरानदरम्यानच्या मिनीट्रेनचा रेल्वेमार्ग अतिवृष्टीत वाहून गेला होता. त्यामुळे मध्य रेल्वेकडून या मार्गावर आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असून पर्यटकांचे खास आकर्षण असलेली मिनीट्रेन लवकरच रूळावर येणार आहे.
सन 2019मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानंतर या मार्गावरील लाकडी स्लिपर्सच्या जागी सिमेंट स्लिपर्स आणि संरक्षण भिंती तसेच अँटीक्रश बॅरियर्सचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे जवळपास 30 टक्के पूर्ण झाली आहेत. उर्वरित संपूर्ण कामे मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे.
संरक्षण भिंती, अँटीक्रश बॅरिर्यस तसेच स्लिपर्स बदलणे यासाठी एकूण दहा कोटी खर्च अपेक्षित असून लवकरच कामे पूर्ण करून मिनीट्रेनचा
मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल.
-शिवाजी सुतार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे