Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून कामोठ्यात कबड्डी लीगचा थरार

मुंबई : रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धांची निमंत्रण पत्रिका सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना मंगळवारी देण्यात आली. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, अभिषेक भोपी, देवांशू प्रभाळे उपस्थित होते.

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 17 व 18 मे रोजी कामोठ्यात विद्युत प्रकाशझोतातील कबड्डी लीगचा थरार पहायला मिळणार आहे.
कामोठे सेक्टर 6 मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या प्रांगणात होणार्‍या या स्पर्धेला राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) सायंकाळी 4 वाजता करण्यात येणार आहे.
युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धा ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनाने आयोजित करीत असतात. त्यांची खेळांविषयी आत्मियता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मुव्हमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कामोठे येथे होणार्‍या तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचे जोरदार तयारी झाली आहे. ही स्पर्धा पुरुष गटात होणार असून विजेत्या संघास 21 हजार 111 रुपये, उपविजेत्यास 15 हजार 111 रुपये, तर तृतीय क्रमांकास 11 हजार 111 रुपये आणि तिन्ही विजेत्या संघांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply