माणगाव : प्रतिनिधी
येथील नगरपंचायत उपनगराध्यक्षपदाच्या बुधवारी (दि. 17) झालेल्या निवडणुकीत माणगाव विकास आघाडीतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेश गोकुळदास मेहता विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका हर्षदा सुमित काळे यांचा पराभव केला. उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल मेहता त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सन 2021-22मध्ये झाली होती. 17 सदस्य संख्या असलेल्या या नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजपने एकत्रित येत माणगाव विकास आघाडी तयार केली होती. या निवडणुकीत माणगाव विकास आघाडीचे नऊ, तर राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे माणगाव विकास आघाडीने नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर नगराध्यक्षपदी ज्ञानदेव पवार, तर उपनगराध्यक्षपदी सचिन बोंबले विराजमान झाले. ठरवून दिल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्यावर बोंबले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदासाठी बुधवारी नगरपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजपचे नगरसेवक राजेश मेहता यांना नऊ मते, तर राष्ट्रवादीच्या नगरसेविका हर्षदा सुमित काळे यांना आठ मते मिळाली. त्यामुळे मेहता हे उपनगराध्यक्षपदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश मेहता यांचे माणगाव विकास आघाडीचे नेते अॅड. राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, ओबीसी सेलचे रजिल्हा अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, पंचायतराज व ग्रामविकास विभाग कोकण संयोजिका शर्मिला सत्वे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अॅड. महेंद्र मानकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय मोने, माणगाव तालुका प्रभारी अध्यक्ष उमेश साटम, उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, बाबुराव चव्हाण, संजय जाधव, माणगाव शहराध्यक्ष नितीन दसवते, मावळते उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुरेंद्र साळी, सरचिटणीस गोविंद कासार, शिवसेना शहरप्रमुख सुनील पवार, युवा नेते प्रसाद धारिया,माजी उपनगराध्यक्ष नीलम मेहता, आजी माजी नगरसेवक-नगरसेविका, व्यापारी, चाहते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …