Breaking News

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून युवा वॉरियर्स फुटबॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने 20 व 21 मे रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर युवा वॉरियर्स फुटबॉल भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनात आयोजन करीत असतात. त्यांची क्रीडाविषयी आत्मियता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने खेलो युवा स्पोर्ट्स मुमेंट या शीर्षकाखाली फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रकाशझोतात ही फुटबॉल स्पर्धा पुरुष गटात होणार असून यामध्ये नामवंत ़फुटबॉल संघाचा खेळ पहायला मिळणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 25 हजार तर तृतीय क्रमांकास 10 हजार रुपये, तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट किपर आणि फेअर प्ले अवार्ड अशी विविध बक्षिसे असणार आहेत. या स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाचे खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी यांनी केले आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply