Breaking News

कर्जतमध्ये महिलासाठी आरोग्य तपासणी शिबिर

अभिनेत्री जुई गडकरी पालिकेच्या स्वच्छता दूत

कर्जत : बातमीदार

कर्जत नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) शहरातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी यांची कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दूत म्हणून निवड जाहीर करण्यात आली.

कर्जत नगर परिषद कार्यालयाच्या आवारात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केले. या वेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, बांधकाम सभापती स्वामींनी मांजरे, विरोधीपक्ष नेते शरद लाड, नगरसेवक बळवंत घुमरे, विवेक दांडेकर, सोमनाथ ठोंबरे, उमेश गायकवाड, नगरसेविका वैशाली मोरे, भारती पालकर, सुवर्णा निलढे, विशाखा जिनगरे, मधुरा चंदन, पुष्पा दगडे, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील  उपस्थित होते.

महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष संचिता पाटील आणि उपाध्यक्ष प्राची डेरवणकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या शिबिरात डॉ शर्वीणी कुलकर्णी यांनी  महिलांची आरोग्य तपासणी केली. यावेळी महिलांची रक्तगट तपासणीही करण्यात आली.

महिला बालकल्याण समितीच्या वतीने मागील वर्षभरात महिलांसाठी शिवणकाम, मसाले बनविणे, बेकरी प्रॉडक्ट्स, डीटीपी ऑपरेटर आदींचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली होती. हे प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या महिलांना या वेळी प्रमाणपत्रे देण्यात आली. या वेळी कर्जत नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी स्वच्छता दूत म्हणून निवड झालेल्या अभिनेत्री जुई केतन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply