अलिबाग : प्रकाश सोनवडेकर
यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 98 हजार 36 हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, तर तीन हजार 37 हेक्टरवर नाचणीची लागवड केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हा नियेाजन भवन येथे झाली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली.
खरीप हंगामातील भातपिकासाठी 98 हजार 36 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून तीन हजार 176 किलोग्रॅम प्रतिहेक्टर उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. खरीप हंगामातील नाचणी पिकासाठी तीन हजार 37 हेक्टर क्षेत्रावर नियोजन असून एक हजार 322 किलोग्रॅम प्रतिहेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
या हंगामातील भातपिकासाठी 17 हजार 450 क्विंटल बियाणांची, नागली पिकासाठी 150 क्विंटल बियाणांची, तूर पिकासाठी 850 क्विंटल बियाणांची, मूग पिकासाठी 55 क्विंटल बियाणांची, भाजीपाला व इतर पिकासाठी 175 क्विंटल बियाणांची, उडीद पिकासाठी 90 क्विंटल बियाणांची अशी एकूण 19 हजार 400 क्विंटल बियाणांची गरज असून 10 मे अखेर आठ हजार 945 क्विंटल भात बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे.
या वर्षासाठी 17 हजार 460 मेट्रिक टन खतांची मागणी असून आतापर्यंत एक हजार 160 मेट्रिक टन पुरवठा करण्यात आला आहे.
Check Also
उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …