Breaking News

पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

अलिबाग : रामप्रहर वृत्त
समग्र शिक्षातर्गत इ. पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शासनाने समग्र शिक्षांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक ही योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या एक लाख 89 हजार 274 विद्यार्थ्यांना सात लाख 81 हजार 561 पाठ्यपुस्तके (एकात्मिक पुस्तक संच) शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये ज्या पालकांची मुले शिकत आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांची पुस्तके बाजारातून खरेदी करु नयेत. ही पाठ्यपुस्तके सर्व पात्र शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपलब्ध करुन दिली जातील, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply