भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल आणि उरण तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील बेलपाडा गावात उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणाकरिता जिल्हा वार्षिक नियोजन समितीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 16) झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गव्हाण, उलवे नोड परिसरात विकासाची अनेक कामे मार्गी लागत आहेत. अशाच प्रकारे बेलपाडा येथे रस्ता साकारणार आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास भाजपचे बेलपाडा अध्यक्ष गणेश पाटील, ज्येष्ठ नागरिक अशोक घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, भाजप गव्हाण पंचायत समिती विभागीय अध्यक्ष जयवंत देशमुख, वाहतूक सेलचे हेमंत ठाकूर, मयूर ठाकूर, दत्ता गुरूजी, गिरीश म्हात्रे, विकास पाटील, सतीश म्हात्रे, संतोष म्हात्रे, मनोहर म्हात्रे, अंकुश पाटील, संतोष पाटील, किशोर ठाकूर, विजय पाटील, कबीर म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, मधुकर म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य पंकज पाटील, बेलपाडा ग्रामसुधारणा मंडळाचे सचिव अतिश पाटील, मदन कडू, गजानन म्हात्रे, राम कोळी यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.