Breaking News

पनवेलमध्ये रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पनवेल ः वार्ताहर

कोरोना काळात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. रोज कमाई करून खाणार्‍या लोकांची आणि रिक्षाचालकांची तर बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्र. 18मधील गरजू रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाजवळ करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने घोषणा करूनही रिक्षाचालकांना कोणतीही मदत अद्यापही मिळाली नाही, पण नगरसेवक विक्रांत पाटील यांनी योग्य वेळी मदत केल्याबद्दल जमलेल्या सर्व रिक्षाचालकांनी त्यांचे आभार मानले. माझ्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच तत्पर असतो. लॉकडाऊनमुळे रिक्षाचालकांचा धंदाही मंदावला आहे. काही लोक घरी बसले आहेत. अशा वेळी माझ्या प्रभागातील रिक्षाचालकांना मदत करणे हे माझे परम कर्तव्य समजतो, तसेच यापुढेही हे समाजकार्य असेच सुरू राहील, असे मनोगत या वेळी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी भाजयुमो प्रिंट मीडिया सेल आणि कोठारी फाऊंडेशनचे विमलकुमार जैन, निलेश नाईक, निलेश देशमुख आदी उपस्थित होते.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply