Breaking News

सिडको गृहनिर्माण योजनेची पात्रता यादी जाहीर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सिडको महागृहनिर्माण योजना 2018 च्या अपील प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 30 जुलै ते 13 ऑगस्ट 2019 अशी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडको महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सिडको महागृहनिर्माण योजना 2018च्या अपिल प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या संंकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. अपिल केलेल्या अर्जदारांना स्वतःच्या लॉगइनमध्ये जाऊन माय अ‍ॅप्लिकेशनवर क्लिक करून पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे पात्र अर्जदारांना

वाटपपत्र देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या अर्जदारांनी कागदपत्रांतील त्रुटींची पूर्तता केल्यास सिडकोच्या भविष्यातील गृहनिर्माण योजनेंतर्गत पुनश्च अर्ज करून सोडतीद्वारे यशस्वी झाल्यास पात्र ठरू शकतील.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply