माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन
तळोजा : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका हद्दीत विविध विकासाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक हरेश केणी आणि पापा पटेल यांच्या पाठपुराव्याने तळोजा येथे तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून होणार्या या कामाचे भूमिपूजन परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले.
तळोजा येथील तलाव सुशोभीकरण कामासाठी पनवेल महापालिकेकडून साडेसात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या भूमिपूजन समारंभास माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, हरेश केणी, पापा पटेल, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, भाजप खारघर तळोजा मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, भाजप कार्यकर्ते निर्दोष केणी, वॉर्ड क्रमांक 3चे अध्यक्ष मुनाफ पटेल, शफी पटेल, इस्माईल पटेल, जामा मशीदीचे ट्रस्टी जिया बागवाला, अब्दुल रहिमान सुभेदार आदी उपस्थित होते.