Breaking News

राष्ट्रीय योंगमुडो स्पर्धेत रायगडची टीम चॅम्पियन

मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंगमुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकली.
या स्पर्धेमध्ये 350हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी, एसएमडीएल कॉलेज कळंबोली आणि कारमल कान्वेंट स्कूल कळंबोलीमधील भूपेंद्र मार्शल ट्रेनिंग प्रोव्हाइडर संस्थेचे संस्थापक आणि प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांच्या 46 खेळाडूंनी सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 13 कांस्यपदके जिंकून पहिल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्याचप्रमाणे प्रशिक्षक गायकवाड यांना बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यशस्वी खेळाडू
सुवर्णपदक विजेते : राज शितोळे, सोहम म्हात्रे, अपूर्व ढोबळे, यश मोरे, सोहम कोठावले, हर्षवर्धन पुजारी, सार्थक माने, सुरज गायकवाड, आयुष कांबळे, आदित्य खंडीझोड, अद्विका खोडके, मृणाल गायकवाड, वृद्धी बिराजदार, हर्षाली म्हस्के, सिफा शेख, शिवानी नांगरे, धनेशा शिंगोटे; रौप्यपदक विजेते :  ओम कोठावले, भावेश रोकडे, विशाल बुरंगे, अभीज्ञ गमरे, अर्णव निंबरे, हिमांशु राय, अथर्व नांगरे, प्रथमेश अहिरवाडगी, पार्थ सुतार, अथर्व धमाळ, सुजल कुंभार, सौम्या श्रीवास्तव, भारती चव्हाण, समृद्धी तांगडे, मानसी जाधव, प्रगती अहिरवाडगी; कांस्यपदक विजेते : श्रेयष जगदाळे, वेदांत कुडके, विश्वजीत बुरंगे, अलंकार सावलकर, यशराज चव्हाण, आदित्य जगदाळे, यश खुसपे, आर्यन सावंत, ओम कोकणे, रेहान शेख,  गोवर्धन पुजारी, आयुषी माने, मयुरी पिसे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply