Breaking News

मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानांतर्गत खारघरमध्ये सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट

खारघर : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभर विशेष मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येते आहे. त्यानुसार उत्तर रायगड भाजपच्या वतीने या अभियानांतर्गत समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींचा (सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर मीट) शनिवारी (दि. 24) मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता.

खारघर रॉयल तुलीप येथे झालेल्या या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप महाराष्ट्र पदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी व भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. समाज माध्यमांवरील तब्बल 90 सोशल मिडिया इनफ्ल्यूएंझर यांचा सहभाग या कार्यक्रमासाठी लाभला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीना गोगरी यांनी केले. यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, सोशल मिडिया आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे आणि सामाजिक संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. प्रदेश प्रवक्या श्वेता शालिनी यांनी भारतीय जनता पक्षाचे कार्य यशस्वी करण्यामध्ये सोशल मिडियाने महत्त्वाचे काम केले आहे. सोशल मिडियाची ताकद किती प्रभावशाली आहे हेदेखील त्यांनी सांगितले.

या मेळाव्याला भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, विस्तारक अविनाश कोळी, दीपक बेहरे, सोशल मिडीया सेलच्या सहसंयोजिका मोना अडवाणी, भाजप खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजिका बीना गोगरी, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भोपी, अक्षय सिंग, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, देवांशु प्रभाळे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply