Breaking News

पनवेलमध्ये शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन; भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

शिवजयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा पनवेलचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्ताने सर्व शिवप्रेमींना व शालेय विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रांची माहिती व्हावी यासाठी 300 हून अधिक शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला होता. यात प्रामुख्याने फरशी कुर्‍हाड, मुघल तलवार, मराठा धोप, खंडा, तेगा, निमचा, कत्ती, मराठा तलवार, आलेमानी तलवार, पट्टा, तोफगोळे, ढाल, कट्यार, चिलानम, खंजराली, बिचवा, वाघनखे अशी विविध शस्त्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तसेच या सर्व शस्त्रांची माहितीदेखील सर्व नागरिकांना अनुभवता आली. हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले होते. विक्रांत पाटील यांच्या संकल्पनेतून शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन शहरातील गार्डन हॉटेलच्या मागे मॉडर्न स्वीटसजवळ विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाद्वारे महाराजांची एक आकर्षक मूर्ती प्रभागातील नागरिकांना भेट देण्यात आली. जेणेकरून प्रभागातील नागरिक आपल्या घरात शिवजयंतीच्या दिवशी मूर्तीचे पूजन करून महाराजांना मानाचा मुजरा करून आपला श्रद्धाभाव व्यक्त करू शकतील. या भावनेतून हा उपक्रम राबविला गेला. त्याचप्रमाणे यंदाच्या शिवजयंतीनिमित्त स्वराज्याची राजधानी असणार्‍या किल्ले रायगडावरून शिवज्योत आणली होती. या शिवज्योतीचे सर्व पनवेलकर व परिसरातील नागरिकांनी या वेळी दर्शन घेतले.

स्वराज्य निर्माण करण्यासाठी जन्मभर संघर्ष करणार्‍या महाराजांची जयंती घराघरात साजरी व्हावी याकरीता शिवजयंतीनिमित्त ’शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात’ या उपक्रमाद्वारे महाराजांची प्रतिमा सर्वांना भेट स्वरूपात देण्यात आली.

-विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो

शिवजयंती केवळ उत्सव म्हणून नाही; तर सण म्हणून साजरी झाली पाहिजे. या हेतूने विक्रांत पाटील आणि त्यांच्या युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या सर्व सहकार्‍यांनी साजरी केलेली शिवजयंती अभिमानास्पद आहे.

-बाळासाहेब पाटील, माजी सभापती, कोकण, म्हाडा

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply