Breaking News

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार आणि सहकारी नेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. पवार यांना उपमुख्यमंत्रीपद, तर अन्य आठ जणांना मंत्रीपद देण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी (दि. 2) विस्तार करण्यात आला. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सोबतच अन्य जणांना राज्यपालांनी मंत्रिपदाची शपथ दिली. मंत्रिपद मिळालेल्यांमध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांचा समावेश आहे.
राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, अमोल्ह कोल्हे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

आज अजित पवार आणि त्यांचे काही सहकारी आमदारांनी आपल्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचे सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडले आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल आणि राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

जे घडले, ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. याद्वारे महाराष्ट्रात आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असे तिघेही मिळून महाराष्ट्राला पुढे नेऊ. आम्ही एक अतिशय प्रगल्भ, पुरोगामी, विकास करणारे सरकार देऊ.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

 

 

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply