Breaking News

विनयभंग प्रकरणी आरोपीला एक वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

एकट्या महिलेला रस्त्यात गाठून तिला शिवीगाळ करत विनयभंग करणार्‍या प्रताप शंकर गुरव याला न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. मार्च 2014 मध्ये पीडित महिला ही तिच्या दुचाकीवरून चौक-कर्जत रस्त्याने घरी चालली होती. त्याच दरम्यान प्रताप गुरव याने त्याची दुचाकी आडवी घालत पीडित महिलेला थांबवली. तिला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.  प्रथम वर्ग न्या. आर. डी. वाबळे यांच्यासमोर खटला सुनावणी आला होता. या केसमध्ये सहा महत्त्वाच्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून न्यायालयाने आरोपी प्रताप शंकर गुरव याला  एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून कल्पना फोंडके यांनी काम पाहिले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply