पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील गुजराती समाजाच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत या समाजाच्या वतीने लोकसहभागातून वायु संचलित शवदाहिनी सुरू करण्यात आली आहे. या शवदाहिनीचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते शनिवारी (दि. 1) झाले.
शवदाहिनी लोकार्पणास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उपायुक्त वैभव विधाते, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, गुरूनाथ लोंढे, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नाथाभाई भारवाढ,डॉ. रमेश पटेल यांच्यासह पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते. ही शवदाहिनी पनवेल महापालिकेच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, समाजाप्रती आपली बांधिलकी आणि जबाबदारी स्वीकारून गुजराती समाजाने या प्रकल्पाला सुरुवात केली. त्यामुळे शहरातील सर्व समाजातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या शवदाहिनीसाठी 10 लाख रुपयांची मदत केली.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …