Breaking News

पेणमधील जिते येथे विद्युत उपकेंद्राची उभारणी

  • नागरिक, गणेशमूर्ती कारखान्यांना होणार सुरळीत वीजपुरवठा
  • आमदार रविशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांचे मानले आभार

पेण : प्रतिनिधी
पेणचे आमदार रविशेठ पाटील व भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने खरोशी विभागातील गावांना भेडसावणार्‍या विजेच्या समस्येवर जिते येथे 25 हजार के.वी. क्षमतेच्या विद्युत उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) झाले.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, डी. बी. पाटील, महावितरणचे अभियंते उमाकांत सकपाळे, विश्वास थोरात, हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष अभय म्हात्रे, कळवे सरपंच बाळा पाटील, सचिन पाटील, शंकर मोकल, दुरशेत सरपंच दशरथ गावंड, खरोशीचे महेश पाटील, जिते सरपंच लीलाधर म्हात्रे, मयूर सुर्वे, पायल सुर्वे, सुप्रिया पाटील, सूर्यहास पाटील आदी उपस्थित होते.
पेण तालुक्यातील खरोशी, तरणखोप, जिते, दादर, दुरशेत, हमरापूर, खारपाडा या गावांना स्वतंत्र फिडर नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यांनी अनेक वेळा विद्युत मंडळाकडे पत्रव्यवहार केला तसेच आंदोलने करूनही समस्या कायम होती. या समस्येचा तिढा अखेर पेणचे आमदार रविशेठ पाटील व जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी सुटला असून खरोशी येथे विद्युत उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले. याबद्दल विभागातील नागरिकांनी पाटील पिता-पुत्रांचे आभार मानले.
गणेशमूर्तींचे माहेरघर असणार्‍या पेण तालुक्यातील ग्रामीण भाग व गणेशमूर्ती कारखान्यांना नियमित वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने विद्युत उपकेंद्राच्या माध्यमातून नियोजन करा, अशा सूचना या वेळी आमदार रविशेठ पाटील यांनी महावितरणच्या अभियंत्यांना केल्या.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील म्हणाले की, वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने गणेशमूर्ती व्यावसायिकांच्या सुविधेसाठी आमदार रविशेठ यांच्या प्रयत्नाने हमरापूर विभागाकरिता स्वतंत्र फिडर देण्यात आला आहे तसेच इतरही ठिकाणी स्वतंत्र फिडर असल्याने वीजपुरवठा सुरळीत प्रकारे होणार आहे. यासाठी केलेल्या प्रस्तावाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्काळ मंजुरी देण्यात मिळाल्याने चांगले काम होत आहे.

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply