Breaking News

फिटनेसवरून उडवली सरफराजची खिल्ली

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था

भारत विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर सतत टीका सुरू आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून 89 रनने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. सरफराजच नाही तर इतर खेळाडूंवर देखील टीका होत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याला जाड असल्यावरून चिडवलं जात आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या फिटनेसवरून पाकिस्तानी फॅन्स नाराजी व्यक्त करत आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाल्यानंतर सरफराज मैदानावर उभा असताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तींने त्याला डिवचलं. सरफराज त्याच्याकडे वळून रागाने देखील बघत होता, पण तो त्याला चिडवतच होता. मॅनचेस्टरच्या स्टेडिअमवर हा सगळा प्रकार घडला. त्यावेळी सरफराज कोच मिकी ऑर्थर सोबत उभा होता. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये संतापाची लाट आहे. खेळाप्रती असलेली प्रेम, गांभीर्य आणि फिटनेस यावरून पाकिस्तानी संघावर टीका होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply