Breaking News

पैशांसाठी मित्राचा खून करणारा गजाआड

आरोपीला पनवेल शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात पैशाच्या कारणावरुन मित्राचे शिर धडावेेगळे करून त्याचा खुन केल्याप्रकरणी एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांंनी अटक केली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात 28 जून 2023 रोजीपासुन पनवेल येथुन महंमद अस्लम हाश्मद (वय 42, रा. आशीयाना अपार्टमेंट, पनवेल) हा मिसींग असलेबाबत मुक्कर्रम कसार (रा. नेरूळ) यांनी पोलीस ठाणे येथे दिलेल्या खबरीवरून मोठे मनुष्य मिसींग नं. 68/2023 अन्वये दाखल होती. मिसींगच्या तपासकामी पनवेल शहर पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले. पथकाने मिसींग व्यक्तीच्या शोधकामी मिसींग व्यक्तीचे मोबाईलचे सीडीआर, मिसींग झाले ठिकाणच्या परिसरातील प्राप्त केलेले सीसीटीव्ही फुटेज यांचा तांत्रीक तपास केला.
तपासादरम्यान यातील मिसींग व्यक्तीला त्याचा मित्र नामे शफिक हैदर याच्यासोबत शैवटचे पाहिले असल्याबाबत माहिती समोर आली. त्यावरून शफिक हैदर याच्याबाबत तपास केला असता तो वडघर, पनवेल येथुन अचानक त्याचा मोबाईल बंद करून मुळ गावी उत्तरप्रदेश येथे जात असल्याबाबत माहिती समोर आली. त्यावरुन शफिक अली हैदर याच्याबाबत अधिक तांत्रीक तपास करुन त्यास तपासपथाकाने भोपाळ, मध्यप्रदेश येथे रेल्वेतुन विचारपुस करण्यासाठी थांबिवले. त्याच्याकडे यातील मिसींग व्यक्तीबाबत अधिक तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभुल करत असल्याचे दिसुन आले. त्यावरुन मिसींग व्यक्तीचे काहीतरी बरेवाईट झाले असल्याबाबत संशय बळावला.
शफिक अली हैदर याच्याकडे तपासपथकाने केलेल्या तपासामध्ये त्याने महंमद अस्लम हाश्मद (वय 42) याच्याबरोबर पैशांच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा व शिवीगाळीचा राग मनात धरून 28 जून 2023 रोजी पहाटेच्या दरम्यान शॉप नं. 01, दिप एन्टरप्राईजेस बिल्डींग, प्लॉट नं. 66, सेक्टर आर-1, चिंचपाडा, पुष्पक नोड, वडघर, ता- पनवेल या ठिकाणी अस्लम याचे मानेवर मासे कापण्याच्या सुर्याने वार करून त्याचे मुंडके धडावेगळे करून खुन केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे धड 3/4 नायलॉनच्या गोणी एकात एक भरून प्रेत भरुन चिंचपाडा, कळंबोली सर्वीस रोडचे डावे साईडला रस्ताचे कडेला टाकुन दिले व मुंडके करंजाडे येथील नाल्यात टाकले असल्याचे सांगितले.
शफिक अली हैदर याने दिलेल्या कबुलीप्रमाणे तसेच सांगितलेल्या हकिकतीप्रमाणे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात आरोपीत शफिक अली हैदर (वय 43 वर्षे, रा. वडघर, पनवेल, मुळ राह- सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली असुन आरोपीत याच्याकडे केलेल्या तपासात त्याने मयताचे धड ज्या ठिकाणी टाकले ते ठिकाण दाखवले. त्याप्रमाणे आरोपीत याच्या सांगण्याप्रमाणे मयताचे मुंडके नसलेले धड मिळुन आले आहे. हे धड शवविच्छेदनाकरीता उपजिल्हा रुग्रालय, पनवेल येथे पाठवण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचेे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करीत आहेेत.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply