Breaking News

माथेरानचे रेल्वे प्रतिक्षालय अजूनही बंद

कर्जत : बातमीदार : नॅरोगेजवर चालणारी माथेरानची मिनिट्रेन कात टाकत आहे.गेल्या दीड वर्षांमध्ये मध्य रेल्वेने तब्बल 7 इंजिन नेरळ लोकोच्या ताफ्यात आणली आहेत. तसेच वेगवेगळ्या सुधारणाही केल्या आहेत, यामध्ये अमनलॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले आहे. मात्र गेल्या सात महिन्यापासून हे प्रतिक्षालय बंद असल्याने पर्यटकांना याचा त्रास होत आहे.

1 मे व 8 मे 2016 रोजी किरकोळ कारणास्तव माथेरानची मिनिट्रेन बंद करण्यात आली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने माथेरान मिनिट्रेनचे काम युद्ध पातळीवर करून सात नवीन इंजिन आणली.घाटरस्त्यात गॅबियन, सुरक्षित कठडे बांधले. तसेच अमन लॉज स्टेशनवर प्रतिक्षालय बांधले. अतिशय सुसज्ज बांधलेल्या या प्रतिक्षालयाचे उदघाटन मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक व विभागीय रेल्वे अधिकारी यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर सात महिने उलटूनही हे प्रतिक्षालय बंद अवस्थेत असल्याने पर्यटक प्रतिक्षालय खुले होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला असता त्यांनी कर्मचारी कमी असल्याचे कारण देत हे प्रतीक्षालय बंद असल्याचे सांगितले.

शटलसेवा एक तासांवर असल्याने पर्यटकांना रेल्वे फलाटावर ताटकळत बसावे लागते. त्या अनुषंगाने आम्ही मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे अमन लॉज स्टेशनमधील प्रतिक्षालय खुले करण्याची मागणी केली आहे. मात्र पर्यटन हंगाम संपत आला तरीही प्रतिक्षालय अजूनही बंद अवस्थेत आहे.

-प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply