पाली ः प्रतिनिधी
पेण तालुक्यातील मुंढाणी येथील प्रियांशी विजय भोईर हिने आपल्या सहाव्या वाढदिवसानिमित्त नागोठणे ते शिहू असे 10 किलोमीटर अंतर भरपावसात धावून केवळ 50 मिनिटांत पूर्ण केले. याबद्दल बेणसे येथील सम्यक कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रियांशीचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कामगार नेते अरुण कुथे, कोळी समाजाचे उपाध्यक्ष अशोक भोय, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे, उपाध्यक्ष दिनेश कडू, सचिव प्रमोद काकडे, कोषाध्यक्ष मंगेश पोंगडे, अमित अडसुळे, आदिनाथ अडसुळे, विजय अडसुळे, विशाल अभंगे, बाळा वाघमारे, प्रमोद शेलार, ज्ञानेश्वर कोळी, कबड्डी पंच विजय भोईर, उपसरपंच संतोष अडसुळे आदी उपस्थित होते.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper