Breaking News

उरण विंधणे येथील विविध विकासकामांचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन

उरण ः रामप्रहर वृत्त
उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीत सहा कोटी 60 लाख रुपये खर्चाची विकासकामे करण्यात येत असून त्यांचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 20) करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक रविशेठ भोईर, माजी पंचायत समिती सदस्य दिशा पाटील, विंधणे ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा डाकी, खोपटे ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर, विंधणे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत, तालुका कोषाध्यक्ष संदीप पाटील, कामगार नेते जितेंद्र घरत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण नाईक, तेजस डाकी, युवा कार्यकर्ते समीर मढवी, भाजप जासई विभाग अध्यक्ष गोपी म्हात्रे, युवा मोर्चा उरण अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शैलेश गावंड, सुरज म्हात्रे, दीपक ठाकूर, कान्हा ठाकूर, मनोहर जोशी, अतुल ठाकूर यांनी केले होतेे.
या वेळी विंधणे ते बोरखार रस्ता डांबरीकरण करणे (चार कोटी 50 लाख रुपये), विंधणे ते खालचा पाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (40 लाख रुपये), बोरखार येथील रंगमंच सुशोभीत करणे (20 लाख रुपये), बोरखार येथे सभामंडप बांधणे (15 लाख रुपये), बोरखार येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), टाकीगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), टाकीगाव येथे स्मशानभूमी बांधणे (15 लाख रुपये), धाकटी जुई येथे सभामंडप बांधणे (10 लाख रुपये), धाकटी जुई येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), विंधणे खालचा पाडा येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (20 लाख रुपये), विंधणे बौद्ध वस्ती येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व स्ट्रीट लाईट बसवणे (30 लाख रुपये) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे दमदार आमदार महेश बालदी यांनी विंधणे ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सहा कोटी 60 लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे. त्याबद्दल त्यांचे या कार्यक्रमात ग्रामस्थांनी आभार मानले.
युपीएससी परीक्षेत यश मिळविणारी अपर्णा अंकुश कातकरी, एमपीएसमध्ये यश मिळविणारा व सहाय्यक नगररचनाकार म्हणून कार्यरत असलेला पियुष घरत आणि अ‍ॅनेस्थेशिया टेक्नॉलॉजीमध्ये डी. वाय. पाटील रुग्णालयात प्रथम क्रमांक पटकाविणारी आदिती ठाकूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Check Also

दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीला एमआयडीसीकडून जागेचे हस्तांतरण

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील दरडग्रस्त माडभुवन आदिवासीवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्न …

Leave a Reply